प्रेम असे कसे…………

ही कविता मी अशा व्यक्तीवर केली आहे की त्या व्यक्तीला मी गेल्या पाच ते सहा वर्षापासून ओळखतो ही व्यक्ती अशी आहे की कधी वाटल न्हवत की ती व्यक्ती एखाद्यावर एवढे प्रेम करेल की ती …त्याच्या सुखासाठी ती स्वताच जीवन पणाला लावेल. पण खर आहे “की एक स्त्री एखाद्यावर एवढे प्रेम करते की त्याच्यासाठी काहीही करायला तयार होते” पण तिला एवढे माहित आहे की तो आपल्यावर खरे प्रेम नाही करत आहे तरीही ती त्याला सोडायला तयार नसते.

स्वप्नात वाटल नव्हत,
मी कुणावर,
तरी प्रेम करेन,
प्रेम करुनी तो,

वाटल नव्हत सोडेल
प्रेमाचा अर्थ नव्हता माहित,
तरी मी प्रेम केल,
अस करुनी सुध्दा,
मग अस का घडल,
की, प्रेमानी मला,
अर्ध्यावर सोडल,
प्रेमात जीवन,
खूप सुंदर वाटत,
प्रेम सोडून जात तेव्हा,
जगन नकोस वाटत,
तन्हान भूक हरवून जाते,
झोप मात्र उडून जाते,
उरते ती फक्त “आठवण”
‘ती आठवण’
मनात निर्माण करते,
ते फक्त ‘प्रश्न’
त्या प्रश्नाचे उत्तर,
न कळे मना,
नकळत सार घडल,
हा कोणाचा गुन्हा,
सुरुवात होते,
तेव्हा, फक्त नजर मिळते,
कावरी होते नजर,
पाहण्यास त्याचे रूप,
अडखळतात शब्द,
हीच प्रेमाची रित,
मनात शब्द असतात,
ओठ मात्र स्तब्ध असतात,
कस बोलाव,
काय बोलाव ,
सुचत नाही,
म्हणून खर प्रेम कुणाला कळत नाही
समीर डांगे

9 thoughts on “प्रेम असे कसे…………

Leave a comment