आस

तुझ्या मनावरच्या फुलाला,
हळूच स्पर्श करायचा आहे,
ओठातल्या मंधुगंधाचा,
गंध मला घ्यायचा आहे,

रातराणीच्या फुलाला,
उमलताना पहायचं आहे,
हातात हात घेवूनी तुझा,
रानोराणी फिरायचं आहे,

गुदमरलेल्या या जीवाला,
आज मुक्त करायचं आहे,
बाहुपाशात तुझ्या,
हरवूनी मला जायाचं आहे,

विलग न होवो,
तुझा बाहुपाश,
मनी माझ्या,
हिच एक आस.

समीर डांगे

Leave a comment