आठवड्याच प्रेम 

​माझी हि कविता म्हणजे सागराच्या किनार्यावर बसून जे प्रेम करतात त्यांच्या आठवणी आहेत ज्यांना प्रेम करण्यासाठी वेळ मिळत नाही ते फक्त आठवड्यातून सागराच्या किनार्यावर जाऊन ते पण आठवड्यातून एकदाच भेटतात आणि आपल्या भावना व्यक्त करतात ते प्रेम.
आठवड्याच प्रेम 
आठवड्यातून दोघांनी,

एकदाचं भेटायचं,

मनातल्या भावनांना,

एकमेकांना सागायचं,
सागर किनारी, 

प्रेम करायचं,

किनार्यावर बसुनी असं,

किती दिवस चालायचं,

सागराच्या लाटेवर,

मन किती दिवस खेळवायचं,

आठवड्यातून दोघांनी,

एकदाचं भेटायचं,
वेड्या मनाला,

कसं ते सागायचं,

दोन तास,

सागराच्या रेतीवरती फिरायचं,

टिपूर अंधारात,

हात-हातात घेवून,

एकमेकांनी बोटांशी खेळायचं,

मी मात्र फक्त,

तुझ्या चेहर्याकडे पहायचं,

चिमुटभर रेती,

मुठीत घेऊन,

दगडावरती बसायचं,

दगडावरती बसून,

मुठीतली रेती,

संपेपर्यंत मनाशी खेळायचं,

खेळता- खेळता,

तू रागवायचं,

पण ओठातून,

एक शब्दही नाही काढायचं,

असा कसा राग तुझा,

कधीच नाही कळायचं,

कोडं उमगळ,

कि तू हळूच,

कुशीत येऊन शिरायचं,

माथा छातीवरती ठेवून,

घट्ट मिठीत घ्यायचं,

डोळे बंद करून,

मनात तू हसायचं,

केसावरती हात फिरवत,

मग तुला माफ करायचं,

मावळतीला जाणार्या सुर्याला,

सागरात डूबताना पहायचं,

खळखळणाऱ्या सागराला,

अंधारात सोडायचं,

सुसवे-फुगवे सांर,

तिथेच संपवायचं,

आलेल्या वाटेने,

आठवणी उरात घेवूनी,

मग, घराकडे निघायचं,

आठवड्यातून दोघांनी,

एकदाचं भेटायचं.
समीर डांगे

Advertisements

3 thoughts on “आठवड्याच प्रेम 

  1. सुन्दर दृष्य रचला आहेस । मला ह्या अोळ्या खुपच आवडलेत
    ” वेड्या मनाला,

    कसं ते सागायचं,

    दोन तास,

    सागराच्या रेतीवरती फिरायचं,

    टिपूर अंधारात,

    हात-हातात घेवून,

    एकमेकांनी बोटांशी खेळायचं,”

    किति beautifully scene capture केला आहे 😀

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s