चारोळी

Advertisements

आर्तता 

​तु दाखविलेली वाट,

अजूनही आठवते,

तेव्हा ती वाट,

किती सरळ,

पण आज ती वाट,

वाकडीतिकडी जाते,

तेव्हा त्या वाटेवर,

फक्त फुले फुलायची,

पण आज त्याच वाटेवर,

काटे फुलतात,

त्याच वाटेवर चालताना दोघे,

त्या फुलाशी खेळत,

किती हसायचो,

पण आज त्याच वाटेवर चालताना,

पायाला काटे रुततात,

     समीर डांगे

चारोळी

​अंधारात दिसला होता,

आशेचा एक किरण,

जागे झालो तेव्हा कळल,

ते एक स्वप्न होत,

ते नव्हत खर जीवन.

      समीर डांगे

चारोळी

​का कुणास ठाऊक,

तुझ्याशी बोलत राहवस वाटत,

डोळ्याची पापणी हळली,

कि, समोर तू असावस वाटत.

        समीर डांगे

Y don’t know likes to keep on talking with you. Whenever eyes blink feel you to be in front of me.

        Sameer dange 

चारोळी

​बंद गुलाबी ओठात,

कळी फुलली गाळात,

विखुरलेल्या केसात,

बसली ती मनात,                                                  नयनातल्या बाहुलीत दिसत होत,

मनातल कुंतल,

मनातच हसत होत,

हसता हसता ते,

फुलासारख फुलत  होत.