मी तुझ्यावर प्रेम केलं आहे?

मनात अनेक प्रश्न असतात पण सर्वच प्रेश्नाचे उत्तर आपल्याला मिळत नाही. आणि प्रेमात तर नाहीच नाही. ही कविता म्हणजे माझे फक्त प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा जरी प्रयत्न केलात तरी त्या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही….

झोका वाऱ्याचा,
आजूनही,
तुझ्या केसांना झुलवत राहतो ना?
तुझी ओढणी,
अजूनही,
डोक्यावरून सरकत असेल ना?
केसात तुझ्या,
अजूनही,
फुले सजत असतील ना?
थंड वाऱ्याचे झोके,
रात्रीच्या वेळी,
तुझ्या अंगाला झोंबत असतील ना?
ती चंद्राची रात्र,
तुला स्वप्नात घेवून जात असेल ना?
सूर्याची किरणे,
सकाळच्या वेळी,
तुझी झोप उडवत असतील ना?

माझ्या आठवणीने “प्रिये’
तू तुझ्या मनाजवळ बोलत असशील ना?
मी तुला दूर उभा राहून पाहतो आहे,
हे तू मनात पाहत असशील ना?
झोका वाऱ्याचा,
आजूनही,
तुझ्या केसांना झुलवत राहतो ना?
कोऱ्या कागदावर,
तू माझे चित्र रेखाटत असशील ना?
आलटून-पालटून बघत असताना,
तू खूप हसत असशील ना?
हसत असताना,
तुझे डोळे पाण्याने भरून येत असतील ना?
तेव्हा, मला उन्हातून सावली देणारी,
तुझी ती ओढणी भिजून जात असेल ना?
पाऊसाळ्यात रिम-झिम पडणारा तो पाऊस,
माझ्या त्या आठवणी,
तुला आठवत करून देत असतील ना?
एक एक शब्द मझे,
तुला आठवत असतील ना?
तुला आठवत असतील ना?
या सर्व प्रश्नाचे,
तू मला काही तरी उत्तर देशील ना?
उत्तर देशील ना?
उत्तर देशील ना?
समीर डांगे

2 thoughts on “मी तुझ्यावर प्रेम केलं आहे?

Leave a reply to maazyakavita Cancel reply